स्वदेशी लिथियम आयन बॅटरीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:34+5:302021-01-13T04:23:34+5:30
डॉ. राजेंद्रकुमार शर्मा : ''''''''टीटीए''''''''तर्फे व्याख्यानाचे आयोजन पुणे : "मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर ...
डॉ. राजेंद्रकुमार शर्मा : ''''''''टीटीए''''''''तर्फे व्याख्यानाचे आयोजन
पुणे : "मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. देशात प्रथमच लिथियम आयन बॅटरी उत्पादित करण्याचे संशोधन पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाला उत्पादनात रूपांतरित करून स्वदेशी लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरु होणार असल्याने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे," असे मत संशोधक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) भारतीय बनावटीच्या लिथियम आयन बॅटरीची प्रगती यावर आयोजित व्याख्यानात डॉ. शर्मा बोलत होते. रविवारी झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी ''''''''टीटीए''''''''चे यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विश्वास काळे आदी उपस्थित होते.
डॉ. शर्मा म्हणाले, "लिथियम आयन बॅटरीच्या जगातील संशोधनात भारतीयांचा वाटा ७० टक्के आहे. शिवाय ही बॅटरी बाजारात येऊन २० वर्षे होत आली. मात्र, दुर्दैवाने या बॅटरीच्या उत्पादनात एकही भारतीय कंपनी नाही. ही बाब लक्षात घेऊन मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सेंटर ऑफ मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे संशोधन उत्पादन होत आहे."