पावसाअभावी भातलागवडी खोळंबल्या, भातउत्पादक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:16+5:302021-07-08T04:09:16+5:30

--- डिंभे : रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. मृगानेही सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने ...

Due to lack of rains, paddy fields were dug up and paddy growers were waiting for rains | पावसाअभावी भातलागवडी खोळंबल्या, भातउत्पादक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

पावसाअभावी भातलागवडी खोळंबल्या, भातउत्पादक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

---

डिंभे : रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. मृगानेही सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र सुरू झालेल्या भातलागवडी खोळंबल्या आहेत. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. सुरू केलेल्या भातलागवडी खाचरांतील पाणी आटू लागल्याने अडचणीत येऊ लागल्या असून भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

दर वर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल या आशेवर भातपिकाची पेरणी केली जाते. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली यंदा भातपीक चांगले येणार असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. या नक्षत्रात पाऊस झाल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठी येतात.

यंदा रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. भातरोपेही उगवून येऊ लागली आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगातील अतिदुर्गम भागात पावसाचे प्रमाण बरे असल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा भातलागवडी सुरू केल्या होत्या. मात्र, मृग नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पावसाने दडी मारली आहे. यामुळे सुरू झालेल्या भातलागवडी संकटात सापडल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून रोपांना पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी शेकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

मागील काही वर्षांपासून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातशेतीला पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा तर कधी लागवडीसाठी. यंदाही भातलागवडी सुरू होताच पावसाने आपले लहरीपणा दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे पुणे जिल्हयातील हजारो लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाचे मुख्य अधार समजली जाणारी भातशेती संकटात सापडू लागली आहे.

--

चौकट

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. भातशेती हीच येथील शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते. आंबेगाव तालुक्यात - ५५०० हेक्टर, जुन्नर ९३००, मावळ - ९७००, भोर - ७५००, वेल्हा - ६०००, हवेली - २८००, खेड - ६७००, मुळशी - १५७०० व पुरंदर - १४००हेक्टर एवढे क्षेत्रावर दरवर्षी भातलागवडी केल्या जातात.

--

फोटो क्रमांक : ०७ डिंभे भात शेती

फोटो ओळी : पावसाने दडी मारल्याने भातलागवडीची कामे खोळंबली असून, शेतकऱ्यांना पावसाची भातरोपे संकटात सापडली आहेत. (छायाचित्र- कांताराम भवारी)

070721\07pun_15_07072021_6.jpg

फोटो क्रमांक :  ०७ डिंभे भात शेतीफोटो ओळी : पावसाने दडी मारल्याने भातलागवडीची कामे खोळंबली असून साठी शेतकऱ्यांना पावसाची भातरोपे संकटात सापडली आहेत (छायाचित्र- कांताराम भवारी)

Web Title: Due to lack of rains, paddy fields were dug up and paddy growers were waiting for rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.