सिग्नलच्या अभावामुळे कोंडी

By admin | Published: December 24, 2016 12:50 AM2016-12-24T00:50:11+5:302016-12-24T00:50:11+5:30

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील डीपी रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसल्याने सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी

Due to lack of signal | सिग्नलच्या अभावामुळे कोंडी

सिग्नलच्या अभावामुळे कोंडी

Next

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील डीपी रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसल्याने सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी हमखास वाहतूककोंडी होऊ लागली असून, वाहनचालकांना त्याचा मन:स्ताप होत आहे.
वडगावमधून येणारी अवजड व हलक्या वाहनांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सरळ सिंहगड रस्त्यावर येत असल्याने मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा येतो. डीपी रस्त्यावरून चारचाकी वाहन वळून ह्युम पाइप कंपनीसमोरून माणिकबागेच्या दिशेने जाताना माणिकबागेकडून वडगावकडे जाणारी वाहने अडून बसल्याचा अनुभव सकाळी साडेनऊ ते अकरा आणि सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ दरम्यान नेहमी येतो.
डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची आणि मुख्य रस्त्यावरील वाहनांची एकमेकांचा अंदाज नसल्याने धडक झाल्याची उदाहरणे घडली होती. या डीपी रस्त्यावरील वाहतुकीसाठी दुभाजक तोडण्यात आला.
वास्तविक या नव्या रस्त्यावरील वाहने वीर बाजी पासलकर उड्डाणपुलाजवळून वळून माणिकबागेच्या दिशेने गेली असती तर आजच्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना कोंडीमध्ये अडकून पडावे लागले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
डीपी रस्त्यावर गतीनियंत्रक तयार करावेत किंवा ट्रॅफिक सिग्नलचा दिवा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे केली होती.
मात्र, वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेवर आणि पालिकेने पोलिसांवर जबाबदारी ढकलल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून हमरस्त्यावर वाहतूक पूर्वीप्रमाणे प्रवाही राहिलेली नाही.
रोजची वाहतूककोंडी फोडण्यासाठी डीपी रस्त्यावर आतातरी ट्रॅफिक सिग्नल बसवावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी दत्तवाडी वाहतूक पोलीस विभाग आणि महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.