संवाद हरवल्याने जुळेनात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:14 AM2017-08-14T00:14:48+5:302017-08-14T00:14:50+5:30

विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

Due to losing the dialogue | संवाद हरवल्याने जुळेनात सूर

संवाद हरवल्याने जुळेनात सूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. परंतु, कुटुंबातील, नात्यातील सुसंवाद हरपला आहे. एकमेकांना समजून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विश्वास आणि सामंजस्याची भावना त्यांच्यात रुजत नाही. नात्यातील अन्य व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप, नवदाम्पत्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. अशा विविध कारणांमुळे उच्च शिक्षित, तसेच नवविवाहितांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे मत समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये नवविवाहित महिलांंच्या आत्महत्येच्या घटनांचा समावेश आहे. त्यातही उच्चशिक्षित महिला आणि नवविवाहित दाम्पत्य असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
हुंडा ही अनिष्ठ प्रथा नष्ट होण्यासाठी कायदा अंमलात आला. परंतु खोलवर रुजलेली प्रथा आजही समाजात आहेच. आयटीत काम करणाºया अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार, घरची आर्थिक सुबत्ता असताना, पत्नीच्या वडिलांनी हुंडा स्वरूपात काही तरी द्यावे. ही अपेक्षा त्या खोट्या प्रतिष्ठेपायी व्यक्त होत असते. हुंडा घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेल्याने सुश्क्षिित तरुणांकडून नवविवाहितांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. - अ‍ॅड़ मनीषा महाजन
माहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी करून छळ केल्यामुळे पुनावळे येथे माधुरी किरण फडतरे हिने आत्महत्या केली. किरण फडतरे आणि माधुरी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला. विवाहानंतर किरण याने माधुरीकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. छळाला कंटाळून माधुरीने २४ फेब्रुवारी २०१७ ला आत्महत्या केली़
आयटी अभियंते यांना गलेलठ्ठ पगार असतो, तरीही पत्नीने माहेरहून पैसे आणावेत अशी अपेक्षा का बाळगली जाते? असा प्रश्न अशा घटना घडू लागल्याने उपस्थित होऊ लागला आहे.
उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार चिखली, मोरेवस्ती भागात उघडकीस आला. अनिकेत विलास ढमाले (वय २५), अश्विनी अनिकेत ढमाले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
>हुंड्याची प्रथा अजूनही रूजलेली
माहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार तगादा लावला. तसेच पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे प्रियंका इतेश शेंडगे या विवाहितेने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खडकी येथे घडली. २० डिसेंबर २०१५ ला तिचे इतेशबरोबर लग्न झाले होते. अवघ्या दोन वर्षांत तिने स्वत:ला संपविले.
महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
नवविवाहितेने तिसºया मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील भीमनगर येथे घडली. पुष्पा हर्षद लोखंडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नवविवाहितेने आत्महत्या केली. महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता.

Web Title: Due to losing the dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.