नीरेचा पाणीसाठा संपुष्टात
By admin | Published: April 13, 2017 03:38 AM2017-04-13T03:38:22+5:302017-04-13T03:38:22+5:30
नीरा नदीतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने परिसरातील मेढपाळांचे पाणी व चारा यासाठी हाल होत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी सर्वजण हैराण झाले आहेत.
निरवांगी : नीरा नदीतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने परिसरातील मेढपाळांचे पाणी व चारा यासाठी हाल होत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी सर्वजण हैराण झाले आहेत.
कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी परिसरातील नीरा नदीतील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. पाणी नसल्याने या परिसरातीलमेंढपाळ, पशु-पक्ष्यांचे चारापाणी व अन्नासाठी मोठे हाल होत आहेत. नीरा नदीलगत चारा, पाण्याकरिता मेंढपाळ भटकंती करीत आहेत तर पक्षी अन्न व पाण्याकरिता नदीच्या कोरड्या असलेल्या पात्रात दिसून येत आहेत.
नदीच्या किनारी असलेली पिके पाण्यावाचून जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत. भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडावे, अशी मागणी शेतकरी व पक्षीप्रेमी करीत आहेत.(वार्ताहर)