महाराजस्व अभियानामुळे सर्वसामान्यांची रेंगाळलेली कामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:52+5:302021-09-27T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात आहे. सर्वसामान्यांची ...

Due to Maharajaswa Abhiyan, the lingering works of the common people will be solved | महाराजस्व अभियानामुळे सर्वसामान्यांची रेंगाळलेली कामे मार्गी

महाराजस्व अभियानामुळे सर्वसामान्यांची रेंगाळलेली कामे मार्गी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात आहे. सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत, असे प्रतिपादन भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी धांगवडी (ता.भोर) येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे वेळी केले.

यावेळी भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोर तहसीलदार सचिन पाटील, भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, किकवी मंडलाधिकारी मनिषा भुतकर, तलाठी सुधाकर सोनवणे, चंद्रशेखर जगताप, किरवले उपस्थित होते.

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, सातबारावरील पोटखराबा लागवडीयोग्य करून क्षेत्र वाढ करणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तुनिष्ठ नोंदी घेणे, पाणीपुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे आदी लोकाभिमुख घटकांचा महाराजस्व अभियानात समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी ७५ उत्पन्न दाखले, १५ सर्कल उत्पन्न दाखले, ७८ रेशन कार्डची प्रकरणे,२० ई-सेवा केंद्र प्रतिज्ञापत्र, ई-पीक पाहणीकरिता शेतकऱ्यांना मोबाइलवर ४० ॲप डाउनलोड करून देण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच विजय गरुड, नवनाथ भिलारे, नवनाथ कदम, बाळासाहेब बोबडे, अभिमन्यू कोंढाळकर, संगीता मोरे, सुरेखा निगडे, सोमनाथ निगडे, संतोष मोरे, नरेंद्र मोदी, किरण घारे, विकास गाडे सर्व पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक व लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सोबत : धांगवडी (ता.भोर) येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे वेळी भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि भोर तहसीलदार सचिन पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

260921\img-20210923-wa0055__01.jpg

???? ???? ? ?? : ???????( ??.???) ???? ????????? ?????? ???????????? ???? ??? ????????????? ???????? ???? ??? ??? ???????? ???? ????? ??????????? ?????????? ????.

Web Title: Due to Maharajaswa Abhiyan, the lingering works of the common people will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.