रानगव्याचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:03+5:302020-12-23T04:08:03+5:30

पाषाण तलावाजवळ असलेल्या संरक्षण खात्याच्या परिसरामध्ये अनेक जंगली प्राणी आढळून येतात. या परिसरात गायी गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा ...

Due to the natural habitat of Rangava | रानगव्याचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात

रानगव्याचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात

Next

पाषाण तलावाजवळ असलेल्या संरक्षण खात्याच्या परिसरामध्ये अनेक जंगली प्राणी आढळून येतात. या परिसरात गायी गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा जंगली प्राण्यांचे तसेच रानगाव्याचे दर्शन होते.

एच ई एम आर एल परिसरातील रानगवे ज्या सीमा भिंतीलगत फिरतात त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यामुळे नैसर्गिक आदिवास कमी झाल्याने रानगवे लगत असलेल्याा शहरी भागाकडे फिरत असल्याचे पहायला मिळत आहे.

एच ई एम आर एल सीमा भिंती लगत बांधकामांना परवानगी नसताना महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे हॉटेल शोरूम झाले आहेत. यामुळे ओढ्या नाल्यांचे प्रवाह देखील बदलले असल्याने नैसर्गिक पाण्याचे प्रवाह देखील दूषित झाले आहेत.

तसेच महामार्गालगत टाकण्यात येणारा राडारोडा यामुळे वन्यप्राण्यांच्या तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण झाल्याने हे प्राणी मानवी प्रश्नांकडे वारंवार येताना चित्र पहायला मिळते.

संरक्षण खात्याच्या भिंतीलगत कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसताना ही बांधकामे कशी झाली व त्यांच्यावर कारवाई का होत नाही अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय आहे याची देखील चौकशी या निमित्ताने होणे आवश्यक आहे अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.

Web Title: Due to the natural habitat of Rangava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.