नवरात्रीमुळे आॅटोमोबाईल क्षेत्रात तेजी, बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, मुहूर्त साधण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:17 AM2017-09-28T05:17:33+5:302017-09-28T05:17:40+5:30

एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे.

Due to Navratri, automobile market rises, consumer crowds for shopping in the market | नवरात्रीमुळे आॅटोमोबाईल क्षेत्रात तेजी, बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, मुहूर्त साधण्यासाठी लगबग

नवरात्रीमुळे आॅटोमोबाईल क्षेत्रात तेजी, बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, मुहूर्त साधण्यासाठी लगबग

Next

पुणे : एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे. साडेतीन मुहूर्तांपैैकी एक असणाºया दसºयाच्या मुहूर्तावर गाडी घरी आणण्याकडे कल असतो. त्यामुळे आॅटोमोबाईल क्षेत्रातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेकंड हँड गाड्या घेण्याकडील कलही वाढला आहे.
सणासुदीच्या काळात दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड उडालेली दिसते. पसंतीचे वाहन मिळावे, यासाठी नवरात्रीच्या आधीपासूनच तयारी केलेली असते. ग्राहकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शोरूम मालकही सज्ज झाले आहेत. इतर वेळच्या तुलनेत नवरात्रीमध्ये गाड्यांची संख्या २५-३० टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज शोरूम मालकांनी नोंदवला आहे.
नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर पडणे आणि सुकर प्रवास करण्याच्या दृष्टीने दुचाकी खरेदी करण्याकडील कल गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जीवनशैैलीतील बदलांमुळे चारचाकी खरेदी करणाºया ग्राहकांची संख्याही वाढली आहे. सणासुदीच्या काळामध्ये शोरूम मालकांकडून गाड्यांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट आणि सवलत जाहीर केली जाते.
जुनी गाडी देऊन नवीन गाडी खरेदी करा, गाडीच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, स्क्रॅच कार्ड योजना, मूळ किमतीमध्ये १०-२० टक्के सवलत, दुचाकीच्या खरेदीवर ५ लिटर पेट्रोल भरून मिळेल, फ्री अ‍ॅक्सेसरीज, लकी ड्रॉ, कूपन कोड अशा विविध आकर्षक योजनांमुळे ग्राहक या काळात आॅटोमोबाईल खरेदीला
पसंती देतात.

आमच्या प्री-ओन्ड कार शोरूममध्ये एक्चेंजमध्ये आलेल्या गाड्या पूर्ण प्रक्रिया करून विकल्या जातात. नवरात्रीच्या काळात या गाड्यांसाठी ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. चौकशीसाठी ग्राहकांचे दररोज फोन येत असतात. दर महिन्याला आमच्याकडे १५० ते २०० गाड्या विकल्या जातात. नवरात्रीमुळे या महिन्यामध्ये २५० गाड्यांची विक्री झाली आहे.
- विशाल जाधव, साई र्सिर्व्हस

दसरा जवळ आला असल्याने शोरूममध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. सध्या बाजारात खरेदीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. बाईक बरोबरच स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. मध्यमवर्गीय लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत त्याचबरोबर मोलमजुरी करणारे कामगार आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरकारी कर्मचाºयांना गाडी खरेदीवर १५०० रुपये सवलत आहे तर स्कूटरवर ३००० रुपये सवलत देण्यात आली आहे. गाडी घेतल्यावर ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. आता यावेळी १५ ते २० टक्के व्यवसाय वाढला आहे.
- नीलेश सोनवणे, शुभ्यान हिरो शोरूम

Web Title: Due to Navratri, automobile market rises, consumer crowds for shopping in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.