दुभाजक नसल्याने अपघात नित्याचेच
By admin | Published: April 25, 2016 01:45 AM2016-04-25T01:45:30+5:302016-04-25T01:45:30+5:30
परिसरातील धर्मराज चौक ते बिजलीनगर येथील रेल वसाहत चौक, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर या मार्गावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
रावेत : परिसरातील धर्मराज चौक ते बिजलीनगर येथील रेल वसाहत चौक, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर या मार्गावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुभाजक उभारण्याची मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत. रस्ता दुभाजक नसल्यामुळे आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या अनेक विद्यार्थ्यांकडे स्टायलिश दुचाकी आहेत. कोणत्याही प्रकारचा विचार न करता तरुण धूम स्टाईल वाहन चालवीत आहेत. कर्कश आवाज, मोठ्या प्रमाणात वेग त्यामुळे इतर वाहनचालक चलबिचल होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या मुख्य चौकात वाहतूक विभागाचे कर्मचारी नसल्यामुळे अशा तरुणांचे फावते अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्या तरुणांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. (वार्ताहर)