अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्याने कर्ज काढून काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:56+5:302020-12-25T04:09:56+5:30
निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक ...
निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व आश्वासन दिले दीड महिन्यानंतर सुद्दा त्यांच्या नुकसान भरपाई पोटी एक पैसाही मिळाला नाही त्यामुळे अखेर पवार यांनी कर्ज काढून शेततले बांधायला पुन्हा सुरवा केली. इंदापूर तालुक्यात दिड महिण्यापुर्वी ढगफुटी प्रमाणे परिसरात पाऊस झाला. याचा परिणाम परिसरातील ओढे , नाले आणी नीरा नदी पात्र सोडून वाहिले त्या पुराचा मोठ फटका निरवांगी गावाला बसला होता. निरवांगी गावात शेतकरी अंकुश पवार यांचे नीरानदी काठी तीन एकर क्षेत्र आहे. येथील गट नं. ९०५ मध्ये नीरानदी पासून काही अंतरावर शेततळे काही वर्षापूर्वी दीडलाख रुपयामध्ये स्वखर्चात बांधले होते. ते शेततळे सुमारे दिड महिण्यापुर्वी नीरानदीच्या पुरस्थितीत वाहुन गेले. दरम्यान महसुल विभागाच्या तलाठी कार्यालयाकडून इतर पिके, फळबांगांचे देखील पंचनामे महसुल सह अन्य कर्मचाऱ्यांनी केले. मात्र वारंवार शेततळे वाहुन गेल्याचे सुचना देऊन पंचनामा झाले नसल्याचे व मदत मिळाली नसल्याचे यावेळी अंकुश पवार यांनी सांगितले.
१०० बाय १०० चौरस फुट असलेल्या शेततळे वाहून गेला असतानाही त्याचा पंचनामा झाला नाही, त्यामुळे झाल्याने शासनाकृडून मदत मिळाली नाही. अखेर मदतीची वाट पाहून नाईलाजास्तव कर्ज काढून शेततळ्याचे काम सुरु केले. या शेततळ्याचे काम सुरु नसते केले तर जणावरांच्या पिण्याचा व शेतीचा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
सध्या जेसीबी मशीन चालवुन मशीनसाठी सर्वसाधारण २५ ते ३० हजार रुपये खर्च होईल तर शेततळ्यासाठी ६० हजाराचा कागद आणि त्यासाठी लागणारी मजुरी १० हजार खर्च मिळून एक लाखाच्या पुढे हा खर्च जाणार आहे. यामुळे कर्ज काढुन खर्च होत असताना संबंधीत शेतकय्राला प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे या शेतकऱ्याच्या मागणी आहे.
--
चौकट
गत वर्षी झालेल्या पावसामुळे ओलादुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नीरा नदी कित्येक वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक वाहुन मनुष्य वस्तीत पाणी आले. मात्र सध्या नीरा नदी पंधरा दिवस पुरेल एवढाच खोरोची व निरवांगी बंधाऱ्यात पाणी आहे. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकणार नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
--