गॅस सि¨लंडर मिळत नसल्याने तारांबळ
By admin | Published: October 29, 2014 12:22 AM2014-10-29T00:22:20+5:302014-10-29T00:22:20+5:30
गॅस सिलिंडरचे वितरण करणा:या वाहतूक संघटनेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने गॅस सि¨लंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Next
पुणो : सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण करणा:या वाहतूक संघटनेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने गॅस सि¨लंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
पुणो जिल्हय़ात 24 लाख 5क् हजार सि¨लंडर ग्राहक असून, शहरात दीडशे वितरक आहेत. त्यांच्याकडे कंपन्यांमधून सि¨लंडरची वाहतूक करणा:या वाहनचालकांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे वाहतूकगाडय़ा कंपन्यांमध्येच अडकून पडल्या आहेत. वितरकांकडे सि¨लंडरचा पुरवठा झालेला नसल्याने सि¨लंडरचे आरक्षण करून 1क् दिवस होऊनही सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचे वितरकांशी वाद होत आहेत.
गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या सुमारास वाहतूक संघटनांनी संप पुकारला होता. तो बरेच दिवस चालल्याने ग्राहकांचे हाल झाले होते. मात्र, यंदाचे आंदोलन लवकर संपण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या राज्याच्या अध्यक्ष उषा पूनावाला यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले, की गेल्या 4/5 दिवसांपासून सि¨लंडर्सचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र, तो लवकरच पूर्ववत होईल. ग्राहकांची सोय होणो साहजिक आहे. मात्र, ज्यांच्याकडे एकच सि¨लंडर असेल त्यांनी दोन सि¨लंडर मंजूर करून घ्यावेत म्हणजे वितरकांचा संप किंवा
अन्य कारणांमुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही. (प्रतिनिधी)
च्अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, की काही गॅस वितरकांकडील पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस कंपन्यांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांशी आपली चर्चा झाली आहे. लवकरच सि¨लंडरचा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी
दिले आहे.