राजकीय लुडबुडीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:40 AM2018-12-24T00:40:46+5:302018-12-24T00:41:08+5:30

शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका दिलीपराव वळसे पाटील यांनी केली.

Due to political interfere Education Sector in trouble - Dilip Walse Patil | राजकीय लुडबुडीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा - दिलीप वळसे पाटील

राजकीय लुडबुडीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा - दिलीप वळसे पाटील

Next

टाकळी हाजी - शिक्षणासारख्या पवित्र कामात शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त काही राजकीय लोकांची लुडबुड वाढल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याची टीका करत राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी सध्याच्या राज्यातील शिक्षणातील बदलाबद्दल खंत व्यक्त केली.

पिंपरखेड (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील होते. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे, अरुणा घोडे, शिरूर, आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शरद लेंडे, सावित्रा थोरात, वासुदेव जोरी, सरपंच मंदा बोंबे, उपसरपंच रामदास ढोमे, शरद बोंबे, भाऊसाहेब ओटी, बाळकृष्ण कळमकर, मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, चांदाशेठ गावडे, माऊली ढोमे, बिपीन थिटे, नरेश ढोमे, दामुशेठ दाभाडे, डॉ. जयश्री ताई जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, नवीन शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, म्हणाले की, पिंपरखेडचे ज्येष्ठ नेते कै. दगडू अप्पा ढोमे यांचे गाव व शालेच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असून या पुढेही गावच्या विकासासाठी निधी कमी कमी पडू दिला जाणार नाही. या वेळी मंगलदास बांदल, विवेक वळसे, सुनीता गावडे, अरुण गिरे, यांची भाषणे झाली.

तुम्ही आखाडा भरवा, मी कुस्ती करणार... बांदल

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बोलायला उभे राहिल्यावर एका शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याबाबतची चिठ्ठी पाठविली, त्यावर बांदल म्हणाले की, कांद्याचा विषय केंद्र सरकारचा आहे, त्यासाठी तुम्ही मला केंद्रात पाठवा, त्यानंतर दुसºया एका कार्यकत्यांनी चिठ्ठी पाठविली की, लोकसभेची कुस्ती करणार का, यावर बोलताना बांदल म्हणाले की, मी पैलवान आहे, तोही शिरूर तालुक्यांचा. बापूसाहेब थिटे व पोपटराव गावडे यांचा पठ्ठ्या आहे. थिटेसाहेब दिल्लीला गेले होते, हा इतिहास आहे. मीही आखाड्यात उतरून कुस्ती खरीच करणार तुम्ही फक्त आखाडा भरवा, असं म्हणताच उपस्थितांमधून प्रचंड दाद मिळाली. यावेळी खासदार आढळराव पाटील व वळसे पाटील मात्र लक्ष देऊन बांदलांची टोलेबाजी ऐकत होते.

Web Title: Due to political interfere Education Sector in trouble - Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.