Supriya Sule: केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचं दिवाळं काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:46 PM2021-10-31T20:46:56+5:302021-10-31T20:57:02+5:30

केंद्र सरकारच्या ढसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार

Due to the poor management of the central government the general public went bankrupt said supriya sule | Supriya Sule: केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचं दिवाळं काढलं

Supriya Sule: केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचं दिवाळं काढलं

Next

धनकवडी : कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून या संकटातून अर्थव्यवस्था सावरली असली तरी वाढत्या महागाईने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे दिवाळं काढलं आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. हे सरकार देशात आणखी काही काळ राहिले तर आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ मोबाईल मध्ये दाखवावा लागेल अशी टिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली.

शारदा फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने आंबेगाव येथील जांभूळवाडी तलाव परिसरात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनशिव व प्रिया वनशिव यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुळे बोलत होत्या.

''संसदेत तरुणांच्या बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्न मांडणार आहे. महापालिका परत मिळविण्याच्या विचाराने नागरिकांनी येत्या पालिका निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडावा असे त्यांनी यावेळी सांगितले.'' 

केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे

आर्यन खानकडे  काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

Web Title: Due to the poor management of the central government the general public went bankrupt said supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.