खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी
By admin | Published: July 14, 2016 12:55 AM2016-07-14T00:55:20+5:302016-07-14T00:55:20+5:30
पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपोच्या दारातच नवीन उड्डाणपुलालगतच्या हडपसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या पाच मीटरच्या अंतरात तब्बल १० ते १५ मोठे खड्डे पडलेले आहेत.
पुणे : पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपोच्या दारातच नवीन उड्डाणपुलालगतच्या हडपसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या पाच मीटरच्या अंतरात तब्बल १० ते १५ मोठे खड्डे पडलेले आहेत.
या प्रकारामुळे या रस्त्यावरून हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांची गती मंदावलेली असल्याने त्याचा ताण स्वारगेट चौकात होणाऱ्या वाहतुकीवर येत असून, जेधे चौक ते पीएमपी डेपोपर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्वारगेट डेपोसमोरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, सुमारे एक ते दीड फूट खोल आणि एक मीटरभर रुंद आकाराचे आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये पीएमपीच्या बससह लहान गाड्या अडकून बंद पडत आहेत, तर दुचाकीचालकांचा तोल जाऊन ते रस्त्यावरच पडत आहेत.
वाहतूककोंडीची समस्या सुटेनाच...
पुणे : शहरात पावसाने उघडीप घेतली असली तरी वाहतूककोंडीची समस्या मात्र कायम असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. बाणेर, औंध, सिंहगड, कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, स्वारगेट, पाषाण परिसरात पुन्हा कोंडी झाली होती. त्यामुळे आधी पावसाने रस्त्यांवर पडलेले खड्ड्यांचे कारण पुढे केले जात असताना शहरात वाहतूक पोलीस आहेत की नाही, असा सवाल पुणेकर करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत.