पुणेकरांना खूशखबर, म्हाडातर्फे ३,१३९ सदनिकांची ३० जूनला सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 10:00 AM2018-05-20T10:00:20+5:302018-05-20T10:00:20+5:30

म्हाडाच्या पुणे विभागातील विविध वसाहतींतील ३,१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला शनिवारपासून प्रारंभ झाला.

Due to Pune, Khushkhbar and MHADA will leave 3,13 9 Tanks on June 30 | पुणेकरांना खूशखबर, म्हाडातर्फे ३,१३९ सदनिकांची ३० जूनला सोडत

पुणेकरांना खूशखबर, म्हाडातर्फे ३,१३९ सदनिकांची ३० जूनला सोडत

Next

मुंबई : म्हाडाच्या पुणे विभागातील विविध वसाहतींतील ३,१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला शनिवारपासून प्रारंभ झाला. १८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २० मे रोजी दुपारी २ ते १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे ३० जून रोजी सकाळी १० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी २० मे दुपारी २ ते १९ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम २० मे रोजी दुपारी २ ते २० जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) २५,००० रुपयापर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५ हजार १ ते ५० हजारापर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता ५० हजार १ ते ७५ हजारापर्यंत, तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे ७५ हजार १ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
आॅनलाइन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ५ हजार ४४८ प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता १० हजार ४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता १५ हजार ४४८ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता २० हजार ४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये आॅनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

उपलब्ध घरांचा तपशील
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर ५ ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण ४४९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटाकरिता महाळुंगे टप्पा-२ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगाव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली-मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चºहोली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे), मौजे वडमुखवाडी, शिवाजीनगर (सोलापूर), डुडुळगाव येथील २,४०४ सदनिकांचा समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटाकरिता सुभाषनगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण २८२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे, तर उच्च उत्पन्न गटाकरिता पिंपरी (पुणे) येथील एकूण ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटाकरिता क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर), वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), तर उच्च उत्पन्न गटाकरिता वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.

Web Title: Due to Pune, Khushkhbar and MHADA will leave 3,13 9 Tanks on June 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.