रागाने पाहिल्याने कोयत्याने वार, वडगाव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:22 AM2017-12-02T03:22:54+5:302017-12-02T03:23:01+5:30

दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत.

 Due to the rage, Koyatane incident in War, Wadgaon | रागाने पाहिल्याने कोयत्याने वार, वडगाव येथील घटना

रागाने पाहिल्याने कोयत्याने वार, वडगाव येथील घटना

googlenewsNext

पुणे : दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत.
सौरभ लहू उंबरे (वय १८), सूरज युवराज शिंदे (वय १९), किसन चंद्रकांत कदम (वय १८), अविनाश मनोज ढेबे (वय १९), ओंकार भारत इनामिके (सर्व रा. सिंहगड रोड ) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अजय वाघ (वय १८, रा. वडगाव बु) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यामुळे दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. विनोद फड याने भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी तेथून निघून गेले. मात्र काही वेळातच आपल्यासोबत आणखी मित्रांना घेऊन येत गणेश म्हसकर याला मारहाण केली. त्यावेळी अजय यांचा मित्र विजय चिंचवडकरसुद्धा तेथे आला होता.
घाबरल्यामुळे अजय तेथून पळून जात असताना आरोपींनी अजयच्या पाठीत कोयत्याने वार केले. तसेच विनोदच्याही डोक्यात कोयत्याने वार केले. विनोदने अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या हातावर तसेच मनगट व पायाच्या नडगीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच मारुती व्हॅनच्या काचा फोडून गाडीचे नुकसान करून आरोपी पळून गेले.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यात नक्की कोणामुळे भांडणे सुरू झाली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एम. साळुंखे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अजय त्याचा आतेभाऊ विनोद फड, मित्र गणेश म्हसकर यांच्यासोबत विनोदच्या व्हॅनमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपींपैकी तिघे दुचाकीवरून जात असताना अजय व त्यांच्या मित्राकडे पाहत होते. त्यावेळी अजय व त्याचे मित्रसुद्धा आपल्याकडे बघत असल्याचा आरोपींना राग आला.
आरोपींनी गाडी वळवून अजय व त्याचे मित्र बसलेल्या व्हॅनजवळ येत त्यांना धमकी दिली. तुम्हाला मस्ती आली आहे का? आम्हाला खुन्नस देता, असे म्हणत फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली.

Web Title:  Due to the rage, Koyatane incident in War, Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा