पावसामुळे द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान
By admin | Published: October 4, 2016 01:30 AM2016-10-04T01:30:17+5:302016-10-04T01:30:17+5:30
येथे दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या कमीअधिक पावसामुळे डाळिंब आणि द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे व औषधफवारणीसाठी उघडीप
निमगाव केतकी : येथे दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या कमीअधिक पावसामुळे डाळिंब आणि द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे व औषधफवारणीसाठी उघडीप न मिळाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून या भागातील द्राक्ष आणि डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांच्या पानांवर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर, लहान द्राक्षघड पाणी साचून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. डाळिंब बागेलासुद्धा कळीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन झाडावरून मोठ्या प्रमाणावर कळीगळती झाली आहे
आतापर्यंत फळबागांवर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाणार, अशी स्थिती निमगाव परिसरामध्ये निर्माण झाली आहे. त्याबरोबरच पुन्हा औषधफवारणी करूनसुद्धा म्हणावा तसा फायदा होणार नाही. बागांमध्ये फूलकळी बाहेर टाकण्याची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे आता या बागा या हंगामापुरत्या तरी सोडून देण्याची वेळ आली आहे. साचून राहिलेल्या पाण्यामुळे झाडांच्या मुळ्या कुजून संपूर्ण बागाच नष्ट होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.