पावसामुळे शेतक-यांना मोठा फटका, जुन्या कांद्याला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:07 AM2017-10-25T01:07:39+5:302017-10-25T01:07:47+5:30
पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. बाजारात येणारा नवीन कांदा खूपच खराब दर्जाचा असल्याने जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळेच कांद्याला चालू हंगामातील उच्चांकी म्हणजे १० किलोंमागे ३०० ते ३४० रुपये दर मिळाला असल्याची माहिती गुलटेकडी मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
दिवाळीपूर्वी आठ-दहा दिवस सलग धुवाधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नवीन कांदा लवकर खराब होतो. यामुळे शेतकºयांनी नवीन कांदा विक्रीसाठी काढल्याने जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. याबाबत पोमण यांनी सांगितले, की भिजलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे या कांद्याला १० किलोंना २०० ते २८० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर, आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे जुन्या काद्याला १० किलोंना ३०० ते ३४० रुपये दर मिळाला.
मंगळवारी मार्केट यार्डामध्ये तब्बल शंभर गाडी कांद्याची आवक झाल्याने १० ते २० रुपयांनी दर किलोमागे कमी झाले आहेत. रविवारी हेच दर १० किलोंमागे ३०० ते ३७० इतके होते. किरकोळ बाजारातदेखील जुन्या कांद्याला मागणी अधिक
आहे.
किरकोळमध्ये एका
किलोसाठी ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये जुन्या कांद्याचा हंगाम संपतो. यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे.
>नव्या कांद्याची प्रतीक्षा
यंदा काही भागामध्ये कांद्याची उशिरा लावगड झालेली आहे. यामुळे सध्या नवीन कांदा अपेक्षेएवढा बाजारात दाखल होत नाही. कांद्याचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येण्यासाठी नवीन कांदा बाजारात दाखल होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. येत्या काही दिवसांत जुन्या कांद्याचे दर वाढणार असल्याचे पोमण यांनी सांगितले. सध्या जुन्या कांद्याला आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यांतून मागणी वाढत आहे. यंदा कर्नाटकामधून होणारी कांद्याची आवक घटल्यानेदेखील काही प्रमाणात दरवाढ झाली आहे.