पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत, शेतकऱ्यांमध्ये समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:40 AM2018-10-02T00:40:25+5:302018-10-02T00:41:13+5:30
शेतकऱ्यांची धांदल : दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी जोरदार वृष्टी
चाकण : दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सोमवारी तब्बल अर्धा तास ते पाऊण तास चाकण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात सोयाबीन काढणी सुरु असल्याने सोयाबीन झाकण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपीट झाली. पुणे-नाशिक महामार्गावर परतीच्या पावसाने पाणीच पाणी झाले होते. चाकण व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.
परिसरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे झेंडू, शेवंती, अष्टरच्या फुलांना फटका बसणार आहे. फुले भिजून खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाने फुले खराब झाल्यास दसºयाला झेंडू भाव खाईल, अशी शक्यता शेतकºयांनी वर्तवली आहे.
एकीकडे पुण्यातील काही तालुक्यात पावसाने थैमान मांडले आहे. तर दुसरीकडे इंदापूर सारख्या तालुक्यात पावस पडत नसल्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहे.
पावसाबरोबर सुसाट वारा व वीज पडत असल्यामळे अनेक नुकसान होत आहे. कोठे रस्त्यावर झाडे पडत आहे, तर कोठे वीज पडल्याने कोणाचा तरी मृत्यू होत आहे. एकंदर पावसाने जिल्ह््यात थैमान मांडले आहे.
४गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्याची आतुरतेने वाट पाहत होता. परंतु अशा सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे कडक उन्हानंतर आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावला आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा घराच्या छतावर लोक मनमुराद भिजत आहेत.
इंदापूर तालुक्यात पावसासाठी नृसिंहाला साकडे
बावडा : इंदापूर तालुक्यात पावसाअभावी सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसाकडे लागून राहिलेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यावर वरुणराजाने कृपा करावी, असे साकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज श्री लक्ष्मी-नृसिंहास घातले आहे. श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेतले. पावसाअभावी इंदापूर तालुक्यात सध्या उन्हाळ्यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर परतीचा पाऊस हा झाला नाही तर मात्र आगामी काळात शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस हा धो धो पडणे अतिशय गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच विलास ताटे देशमुख, नीरा भीमा कारखान्याचे संचालक प्रकाशराव मोहिते, पोलीसपाटील अभय वाकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ राऊत आदी उपस्थित होते.