भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:52 AM2019-01-29T01:52:58+5:302019-01-29T01:53:26+5:30

भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Due to the release of water in the river Bhima, the question is solved | भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

googlenewsNext

राहू : भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भीमा नदीवरील बंधारे कोरडे पडले होते; परंतु भामा-आसखेड धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या पाटेठाण, टाकळी, वडगावबांडे, पानवली, कोरेगावभिवर, वाळकी या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

किमान दोन महिने हे पाणी शेतीसाठी पुरेल, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात व एप्रिलअखेर अशा दोन आवर्तनाची गरज अजून लागणार आहे. तशा प्रकारचे नियोजन संबंंधित खात्याने करावे, अशी मागणी शेतकरीवगार्तून व्यक्त केली जात आहे. या भागात सध्या उसाचा तोडणी हांगाम अंतिम टप्प्यात असून खोडवा पिकासाठी पुढील आवर्तनाची गरज आहे. तरकारीसारख्या पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. बंधारे भरल्याने या नदीवर शेतकºयांनी उभारलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

याबाबत भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापनचे शाखा अधिकारी परिमल सोनवणे म्हणाले, की दुष्काळ असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेतले जातात. त्यामुळे शेतकºयांनी आहे त्या पाण्याचा योग्य नियोजन काटकसर करून पाणी वापरावे जेणेकरून दुष्काळाचा सामना करता येईल.

Web Title: Due to the release of water in the river Bhima, the question is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे