कोरेगावात आरक्षणामुळे इच्छुकांच्या बत्या गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:29+5:302020-12-09T04:09:29+5:30
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगांव भिमा, सणसवाडी, शिक्रापूर यासह मोठ्या गावातील ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पक्षामध्ये ...
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगांव भिमा, सणसवाडी, शिक्रापूर यासह मोठ्या गावातील ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पक्षामध्ये सक्रिय असणाऱ्या अनेक नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी या निवडणुकीला महत्व असते. अनेकांनी आता आपण थांबून दुसऱ्यांना संधी देणार असा शब्द दिल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण आपल्या पथ्यावर पडल्याने अनेकांनी आजच आपला पवित्रा बदल्याने येणा-या दिवसात कोरेगाव भीमा-सणसवाडी येथिल राजकारणाच्या आखाड्यात अनेकांच्या बत्या गुल होतिल तर अनेकांना नवसंजीवनी मिळणार आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाघोली ते शिरुर पर्यंतचा भाग हा औद्योगीकरण व वाढत्या नागरिकणामुळे तालुक्याच्या राजकारणात वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, कारेगाव, रांजणगाव, शिरुर ग्रामीण, तळेगाव ढमढेरे या गावांना वेगळे राजकीय वजन असते. तालुक्याच्या राजकारणात ही गावे सत्ता केंद्रीत असल्याने या गावांमध्ये आपल्या विचारांच्या माणसांचे वजन असण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपले वजन या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये घालीत असते. कोरेगाव भीमा, सणसवाडीसह शिक्रापुर मधील अनेक ठिकाणी एक ते दोन मतांनीही पराभव पत्कारावा लागत असल्याने इच्छुकांनी गेले दोन तिन वर्षापासुन मोठ्याप्रमाणात मतदार नोंदणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या आॅगस्ट महिन्यापासुन लांबलेल्या निवडणुकीत व आरक्षण आपल्या पथ्यावर पडणार नाही ही शक्यता धरुन अनेकांनी इतर तरुणांना अगदी कालपर्यंत तयारी करायला लावली असतानाच कोरेगाव भीमा व सणसवाडी येथिल सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गासाठी आल्याने अनेकांच्या बत्या गुल झाल्या आहेत.
अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण पुरुषाची जागा नसल्याने इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या ठिकाणी कुणबीतुन निवडणुक लढविण्याचीही अनेकांनी तयारी आजच सुरु केल्याने येणा-या काळात कोरेगाव भीमा-सणसवाडीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.