शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 06:26 PM2021-01-13T18:26:55+5:302021-01-13T18:27:32+5:30

आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार

Due to the rising cyber crime in the city, Pune Police has taken this important step | शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी उचलले 'हे' महत्वपूर्ण पाऊल

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्याची पुनर्रचना; गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार ५ युनिटची स्थापना                  

पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे त्यांच्या तपासासाठी सुसुत्रता यावी, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलीस ठाण्याची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आता गुन्ह्याच्या स्वरुपानुसार ५ युनिटची स्थापना करण्यात आली आहे. गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे सोपविले जाणार आहेत. सध्या एकाच तपास अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जातात. त्याऐवजी आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.
हॅकिंग/डाटा चोरी, ऑनलाईन बिझनेस फ्रॉड, चिटिंग फ्रॉड, सोशल नेटवर्किग आणि एटीएम कार्ड फ्रॉड अशी ही पाच युनिट राहणार आहेत.

हॅकिग /डाटा चोरी : डाटा इनस्कीप्ट, मेल हॅकिग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर,
ऑनलाईन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्स, फिप्लकार्ड फ्रॉड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिग मोबाईलर फार मनी टॉन्सफर, ऑनलाईन सेल ॲन्ड परचेस फ्रॉड

चिटिंग फ्रॉड : आनलाईन डेटिग साइट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, जाब फ्रॉड, लोन फ्रॉड, पॅकेज टुर फ्रॉड, मोबाईल टॉवर फ्रॉड, मेट्रिमोनियल फ्रॉड आदि
सोशल नेटवर्किग : फेसबुक, फेक डॉक्युमेंट, फेसबुब हॅकिग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ आदि

एटीएम कार्ड फ्रॉड : मनी ट्रान्सफर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड फ्रॉड, ओटीपी शेअर फ्रॉड, मोबाईल, लॅपटॉप चोरी, इतर
प्रशासन : पोलीस ठाण्याचे सर्व कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलीस ठाण्यांना तांत्रिक सहाय्य.

अशा प्रकारची असणार रचना 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या दिवशी प्राप्त सायबर तक्रारी अर्जाचे युनिटप्रमाणे अधिकाऱ्यांना वाटप करतील. युनिटचे पोलीस निरीक्षक सायबर तक्रारी अर्जाचे पुढील कार्यवाही करता व निर्गती करता त्यांचेकडील सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची, तपासाबाबत तसेच तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत व तक्रारी बाबत चौकशीनंतर व दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेशन करतील.

सायबर पोलीस ठाण्याकडील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अर्जातील फसवणुकीची रक्कम १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, सायबर तक्रारी अर्जास संदर्भात फसवणुक झालेल्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात असेल तर, ज्या सायबर तक्रारी अर्जामधील तक्रार ही डाटा चोरी, सोर्स कोड चोरी, वेब साईट संदर्भातील तक्रारी अशा महत्वाच्या तक्रारी संदर्भात असेल तर अशा तीन महत्वाच्या मुद्द्यावरील तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या बाबत संबंधित सायबर युनिटचे पोलीस निरीक्षक हे कार्यलयीन टिपण्णी ठेवून पोलीस उपायुक्त यांची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करतील. असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.

Web Title: Due to the rising cyber crime in the city, Pune Police has taken this important step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.