वरिष्ठांच्या जाचामुळे संख्येंचा मृत्यू? संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:19 AM2018-06-16T04:19:35+5:302018-06-16T04:19:35+5:30

ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Due to the scope of seniority deaths? The organization's allegations | वरिष्ठांच्या जाचामुळे संख्येंचा मृत्यू? संघटनेचा आरोप

वरिष्ठांच्या जाचामुळे संख्येंचा मृत्यू? संघटनेचा आरोप

Next

- पंकज राऊत
बोईसर  - ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
कारवाई न केल्यास २० जून पासून लेखणी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दिवंगत संखे यांचा त्यांच्या पत्नीनेही मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पालघर तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र पाटील व सचिव मयुर पाटील यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना १२ जून रोजी दिलेल्या निवेदनात राजेश पाटील यांनी बोईसर ग्रामपंचायतीच्या एका जुुन्या प्रकरणाबाबत पदाधिकाºयांना चुकीचे मार्गदर्शन करून ते प्रकरण चिघळवून सतत आर्थिक मागणी करणे, नोटिसा काढणे, चुकीचे अहवाल पाठवून सतत आर्थिक व मानसिक छळ करणे असे प्रकार जयप्रकाश संखे यांच्या बाबतीत केल्याने संखे यांच्या मृत्यूला पाटील हेच जबाबदार असून त्यांनी त्यांचा बळी घेतल्याचा आरोप केला आहे.
तर सदर ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण झालेले असतांनाही त्यांनी जाणीपूर्वक आर्थिक फायद्यासाठी संख्येना त्यामध्ये गोवून त्यांचा बळी घेतलेला आहे. तर बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाटील विस्तार अधिकारी असतांना तसेच बोईसर प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक असतांनाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करता चुकीचे कृत्य करून स्वत:ची जबाबदारी दुसºयावर झटकून फक्त आर्थिक फायद्यासाठीच पिळवणूक करून या ग्रामविकास अधिकाºयाचा बळी घेतला आहे असे निवेदनात उल्लेख आहे.
तसेच विस्तार अधिकारी पाटील हे जे ग्रामसेवक त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाहीत त्यांच्या विरोधात पदाधिकाºयांना भडकावून तक्रारी देण्यास सांगतात व त्या प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर नोटिसा बजावणे, आरोपपत्र दाखल करणे, गुन्हे दाखल करणे अशा पध्दतीने मानसिक त्रास देवून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे कार्यरत ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडते आहे. अशा मुजोर विस्तार अधिकाºयाचा कार्यभार काढून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेने केली आहे. या आरोपा संदर्भात विचारण्या करीता विस्तार अधिकारी पाटील यांचेशी मोबाईल वर कॉल करून व टेक्स मेसेज द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही .

पत्नीनेही केले गंभीर आरोप
दिवंगत संखे यांची पत्नी जान्हवी यांनीही पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकºयांना निवेदन देऊन राजेश पाटील हे माझे पती जयप्रकाश संखे यांना वारंवार फोन करीत होते त्यांचे मानसिक संतुलन बिघडेल असा छळ केल्याचा आरोप करून माझा संसार त्यामुळे उघड्यावर पडला आहे. त्यास सर्वस्वी राजेश पाटील जबाबदार आहेत असा आरोप करून कारवाई ची मागणी केली आहे.

Web Title: Due to the scope of seniority deaths? The organization's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.