इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:15 PM2018-06-05T21:15:32+5:302018-06-05T21:15:32+5:30

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू दाखले आॅनलाईन पध्दतीने देण्याची सोय आहे.

Due to shutting down of internet service the work of birth and death has been stoped | इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प 

इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प 

Next
ठळक मुद्देबीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासून खंडीत बुधवारी इंटरनेटची सेवा पुर्ववत होईल असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट

पुणे : महापालिकेच्या शहरातील अनेक क्षेत्रीय कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने कार्यालयातील अनेक महत्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला. इंटरनेट सेवा बद पडल्याचा सर्वांत मोठा फटका जन्म आणि मृत्युचे दाखले देण्याचा कामावर झाला असून हे कामच मंगळवारी पूर्णपणे ठप्प झाले. 
  महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू दाखले देण्याची सोय आहे. या कार्यालयांमध्ये आॅनलाईन पध्दतीने हे दाखले दिले जातात. मात्र, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयासह शहरातील अन्य पाच ते सहा क्षेत्रिय कार्यालयांना पुरविली जाणारी बीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासून खंडीत झाली होती. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आॅनलाईन पध्दतीने मिळणा-या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जन्म- मृत्युचे दाखले नागरिकांना मिळू शकले नाही. आज बुधवारी इंटरनेटची सेवा पुर्ववत होईल असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
--------------------------
मुख्य इमारतीत इंटरनेट सेवेचा खेळखडोबा
इंटरनेट सेवा नसल्याने महापालिकेच्या मुख्य भवनातील कामकाजही कोलमडले होते. प्रामुख्याने आॅनलाईन सेवांना त्याचा फटका बसला होता. मात्र, सायंकाळी ही सेवा पुर्ववत झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Due to shutting down of internet service the work of birth and death has been stoped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.