तिवरांची कत्तल करून खारजमिनीवर भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:55 AM2018-06-12T03:55:32+5:302018-06-12T03:55:32+5:30
चिंचणी-तारापूर बायपास रस्त्याच्या दुतर्फा खारटण जमिनीवर बेकायदेशीररित्या भराव घालून तिवरांची हानी केल्याच्या लोकमत च्या वृत्ताची दखल घेऊन वाणगाव पोलिसांनी चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियमा द्वारे कारवाई केली असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
- हितेन नाईक
पालघर - चिंचणी-तारापूर बायपास रस्त्याच्या दुतर्फा खारटण जमिनीवर बेकायदेशीररित्या भराव घालून तिवरांची हानी केल्याच्या लोकमत च्या वृत्ताची दखल घेऊन वाणगाव पोलिसांनी चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियमा द्वारे कारवाई केली असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात शासकीय गुरेचरण जमिनीवर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.तर पालघर,सफाळे, केळवे, माहीम, डहाणू, आदी भागातील किनारपट्टीवरील भागात अनेक कोळंबी प्रकल्प व इतर बाबीसाठी खारटण जमिनीवरील तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने ही तिवरांची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्र ारी पुढे येत आहेत. तारापूर-चिंचणी रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या खारटण जमिनीवर भराव घालून,तिवरांची नासधूस करीत बेकायदेशीररित्या भंगाराची आण ि इतर बांधकामे उभारली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. ७ जून रोजी लोकमतने तिवरांच्या कत्तली बाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर डहाणू चे तहसीलदार राहुल सारंग यांनी दखल घेतली. चिंचणी चे मंडळ अधिकारी किरण राठोड ह्यांच्या तक्र ारी नंतर चिंचणी येथील गट क्र मांक २३८८ मधील ०.५३.२० जमिनीवर उगवलेल्या तिवरांंना नुकसान पोहचेल हे माहीत असतांनाही भराव घालणारे आरोपी अश्विन रतीलाल पारेख, प्रविण र.पारेख, रमीला कि. पारेख, सुभाष र.पारेख सर्व राहणार कुरगाव ह्यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. अजूनही पोलिसांनी आरोपीना अटक केली नसून पुढील तपास सुरू आहे.
मंडळ अधिका-यावर कारवाई करा-मागणी
या बायपास रस्त्याच्या कडेला,खाडी नजीक मोठ्या प्रमाणात तिवरांची कत्तल होत असतांना त्याकडे डोळेझाक करणारे मंडळ अधिकारी किरण राठोड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु अद्यापही ती प्रशासनाने दुर्लक्षितच ठेवली आहे.