भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:20 AM2018-08-25T03:20:44+5:302018-08-25T03:21:06+5:30

शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून

Due to the sub-metro rail, | भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती

भुयारी मेट्रोमुळे पेठांमध्ये वाढली धास्ती

Next

पुणे : शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून, आधुनिक तंत्राचा वापर करून हे काम करण्यात येईल. भुयारी मर्गावर अनेक जुने वाडे, घरे येत असून, भुयारी मार्गाचे काम करताना त्यांना धोका पोहोचू शकतो. तब्बल ३२५ कुटुंबांचे भुयारी मेट्रो मार्गामुळे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे सध्या पेठांमधील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मार्गामध्ये कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सुमारे ५.२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीच्या खाली भुयारी असेल. यामध्ये दोन बोगद्यांमधून येणारी आणि जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहेत. या कामासाठी महामेट्रोच्या वतीने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी दिली. या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्थानके असून, ती जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असतील. मेट्रो स्थानकात प्रामुख्याने शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट यांचा समावेश आहे. या मेट्रो स्थानकांसाठी प्रत्येकी सरासरी १० मीटरच जागा मेट्रोला लागणार आहे. भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने खोदकाम करताना हादरे बसत नाहीत. भुयारी मार्गामुळे बांधकामांना कोणताही धोका पोहोचणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.

भुयारी मेट्रो स्थानकासाठी ३२५ कुटुंबांचे स्थलांतर
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मेट्रो मार्गावर एकूण पाच भुयारी मेट्रो स्थानके होणार आहेत. या मेट्रो स्थानकांमध्ये मुबलक प्रकाशयोजना, हवा खेळती राहण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीसाठी बाहेर येण्याचा मार्ग, स्थानकांतून बाहेर येण्याचा मार्ग यासाठी जमिनीवर काही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी ज्या-ज्या ठिकाणी भुयारी मेट्रो स्थानके होणार आहेत, त्या ठिकाणच्या सुमारे ३२५ कटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी दिली.

असे होणार भुयारी मार्गाचे काम...

कृषी महाविद्यालय ते स्वारगेटदरम्यान भुयारी मार्गात एक जाण्यासाठी व एक येणाºया मेट्रोसाठी असे दोन टनेल असतील. हे भुयारी मार्ग सुमारे १६ ते २८ मीटर खोल असून, यासाठी अधुनिक ४ टनेलिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे.

बोगदा करण्यासाठी कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट येथे दोन मोठे खड्डे खोदण्यात येणार असून, तेथूनच साडेपाच किलो मीटरचे बोगदे करण्यासाठी आवश्यक असलेल्या टनेलिंग मशिन जमिनीत घालण्यात येणार आहेत. पुण्यात बहुतेक सर्व ठिकाणी बेसॉल्ट खडक असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचा मेट्रोचा दावा आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर किमान एक वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागेल.
 

Web Title: Due to the sub-metro rail,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.