सुनेशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा खून, झगडेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:21 AM2017-12-11T02:21:26+5:302017-12-11T02:21:38+5:30

आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इस्त्रीच्या वायरने गळफास देऊन चुलत्याने आपल्या मुलाच्या मदतीने पुतण्याचा खून केल्याच्या तक्रारीवरून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 Due to the suspicion of immorality related to Sunita, the incident of murder, murder in Jhagadewadi | सुनेशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा खून, झगडेवाडी येथील घटना

सुनेशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याचा खून, झगडेवाडी येथील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इस्त्रीच्या वायरने गळफास देऊन चुलत्याने आपल्या मुलाच्या मदतीने पुतण्याचा खून केल्याच्या तक्रारीवरून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुभाष हरिदास झगडे, हरिदास निवृत्ती झगडे (दोघे रा. झगडेवाडी) अशी पिता-पुत्र असणा-या आरोपींची नावे आहेत. प्रशांत गोविंद झगडे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दि. १२ नोव्हेंबरला रात्री आठ ते दुसºया दिवशी पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान प्रशांत याच्या राहत्या घरात घडलेल्या या प्रकाराबाबत प्रशांतची आई लता गोविंद झगडे हिने तक्रार दिल्याने उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादीच्या शेजारी राहणारा तिचा थोरला दीर हरिदास झगडे यास फिर्यादीचा मुलगा प्रशांतचे त्याच्या सुनेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याबाबत मुलाला समजावून सांग; अन्यथा त्याचा खून करेन, अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली होती. झगडे यांनी स्वत:च्या मुलाला व आरोपीच्या सुनेला याबाबत समजावून सांगितले होते. आपला मुलगा लहान आहे. तसा काही
प्रकार होत असेल तर तो थांबवावा, असे सांगितले होते. तरीदेखील आरोपी प्रशांतला वेळोवेळी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत होता. दि. १२ नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत घरी आला. ढाब्यावर जेवण केल्याचे सांगून तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला.
झगडे, तसेच त्यांचे पती यांनी जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत झोपायला गेले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झगडे यांना जाग आली. त्या वेळी प्रशांतच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा असल्याचे त्याला दिसले. खोलीत डोकावल्यानंतर तिला घराच्या अँगलला बांधलेल्या इस्त्रीच्या वायरला प्रशांत लटकलेला दिसला. तिने केलेल्या आरडाओरडाकेल्यामुळे लोक जमले. त्यांनी प्रशांतला उतरवून जमिनीवर झोपवले. त्याला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी हरिदास व त्याचा मुलगा सुभाष अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रशांत झगडेवर चिडून होते. त्यांनी वेळोवेळी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्या दोघांनीच गळा आवळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह इस्त्रीच्या वायरच्या सहाय्याने घराच्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला अडकवून ठेवला. भीतीमुळे आपण तक्रार केली नव्हती, असे झगडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title:  Due to the suspicion of immorality related to Sunita, the incident of murder, murder in Jhagadewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.