तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी काही काळासाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:34 PM2019-10-08T14:34:00+5:302019-10-08T14:51:11+5:30

तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळासाठी बंद राहणार आहे.

Due to technical work, the Mumbai-Pune highway will be closed for some time on Wednesday | तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी काही काळासाठी राहणार बंद

तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी काही काळासाठी राहणार बंद

googlenewsNext

पुणे - तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळासाठी बंद राहणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पुणे लेनवर 65.700 किमी या ठिकाणी ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. 

त्यामुळे  बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 2 या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी 52.500 किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर हलकी चारचाकी वाहने आणि अन्य प्रवासी वाहने ही कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील. 

 या कामामुळे बुधवारी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 12 ते 2 या काळात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांशी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Web Title: Due to technical work, the Mumbai-Pune highway will be closed for some time on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.