एनर्जी ड्रिंक्समुळे शहरासह ग्रामीण भागही 'झिंग झिंग झिंगाट'; शंभर मिलीपेक्षा जास्त पिल्यास नशा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:07 PM2023-04-05T14:07:03+5:302023-04-05T14:08:05+5:30

शंभर मिलीपेक्षा जास्त पिल्यास जास्त नशा...

Due to energy drinks, rural areas and the city children, adults are addicted to soft drinks | एनर्जी ड्रिंक्समुळे शहरासह ग्रामीण भागही 'झिंग झिंग झिंगाट'; शंभर मिलीपेक्षा जास्त पिल्यास नशा

एनर्जी ड्रिंक्समुळे शहरासह ग्रामीण भागही 'झिंग झिंग झिंगाट'; शंभर मिलीपेक्षा जास्त पिल्यास नशा

googlenewsNext

भोर (पुणे) : सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेय बाजारात आली आहेत. दुकान हाॅटेल व पानटपरीवर सहज वीस ते तीस रुपयांत थंड पेय मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला, पुरुषही याच्या आहारी गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या शहर व ग्रामीण भागात किराणा दुकान, हॉटेल, पानटपऱ्या थंडपेयाची दुकानांचे कप्पे एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्यांनी खचाखच भरलेली दिसतात, तर सर्वत्र या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. सहज व कमी पैशात मिळत असल्याने लहान मुले याच्या आहारी गेले आहेत. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेतला आहे. वाहनचालकही मोठ्या प्रमाणात याचं सेवन करीत आहेत.

पालकांनो आता सतर्क राहा !

लहान मुले पार्टी करण्यासाठी या बाटल्या घेतात आणि दोन-तीन बाटल्या पित असल्याचे दिसून येत आहे. याचं सेवन केल्यास झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बऱ्यापैकी गुंगी येते. तोंडाचाही वास येत नाही. आणि थोडीफार झिंगही राहते. त्यामुळे सध्या याचा धोका माहीत नसलेले याच्या आहारी गेले आहेत. २५० मि.लि.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये अशी नोंदही या बाटलीवर आहे, तर सूचनेत लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.लि.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ नये, असे स्पष्ट केले असले तरी या सहज उपलब्ध होत असलेल्या नशा गल्लोगल्ली मिळत असल्याने आता नवा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या पालकांना आता सतर्क राहावे लागणार आहे.

शंभर मिलीपेक्षा जास्त पिल्यास जास्त नशा -

कोणत्याही परिस्थितीत कॅफेन धोकादायक आहे. कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये बाळाला अपंगत्व किया मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागत आसल्याचे डाॅक्टर सांगतात.

Web Title: Due to energy drinks, rural areas and the city children, adults are addicted to soft drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.