Veer Dam | वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:01 AM2022-07-12T11:01:29+5:302022-07-12T11:07:39+5:30
सोमवारी दिवसभर धरण परिसरात पाऊस....
नीरा (पुणे) :पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पणीसाठ्यात काल सोमवारी दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. काल दिवस भरात जवळपास १ टीएमसी पाणी वीर धरणात आले असल्याची माहिती अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.
काल (सोमवार, दि.११ जून) सकाळी वीर धरणात ४.३९ टीएमसी म्हणजे ४६ टक्के पाणीसाठा होता. सोमवारी दिवसभर आणि आज मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.३६ टीएमसी म्हणजे ५७ टक्के झाला आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.
असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणत पाणी येणार आहे. या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे. त्यामुळे कालव्यांच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे.
-(भारत निगडे)