कपलिंग तुटल्याने रेल्वे गाडीचे दोन भाग, एक पिंपरेत तर दुसरा भाग नीरा स्टेशनला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:14 AM2022-08-01T09:14:13+5:302022-08-01T09:17:11+5:30

रेल्वे काही अंतर पुढे आल्यानंतर ही घटना उघडकीस....

Due to the broken coupling, the train split into two parts, one at Pimpre and the other at Nira station | कपलिंग तुटल्याने रेल्वे गाडीचे दोन भाग, एक पिंपरेत तर दुसरा भाग नीरा स्टेशनला

कपलिंग तुटल्याने रेल्वे गाडीचे दोन भाग, एक पिंपरेत तर दुसरा भाग नीरा स्टेशनला

Next

नीरा : नीरा (ता. पुरंदर) रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे पिंपरेत राहिला. तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. रेल्वे काही अंतर पुढे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंहिनाचा भाग माघारी आणून हे दोन्ही रेल्वे भाग जोडले. यामध्ये रेल्वेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.

मात्र रेल्वेचा कपलिंग तुटून अर्धी रेल्वे (म्हणजे गार्डचा भाग) पिंपरे येथील फाटकात उभी राहिली. तर अर्धी गाडी रेल्वे (इंजिन कडील अर्धा भाग) स्टेशन मध्ये गेली. यामुळे पिंपरे आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत आले होते. 

मालवाहू गाडी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या धोका नव्हता. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅटिक ब्रेक लागुन जागेवर उभे राहिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला नाही.

Web Title: Due to the broken coupling, the train split into two parts, one at Pimpre and the other at Nira station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.