भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:56 AM2022-05-17T10:56:30+5:302022-05-17T11:01:27+5:30

भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करतायेत

Due to the role of speakers Kakad Aarti will also be closed Doesnt Raj Thackeray know this Question from Dilip Walse Patil | भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

Next

टाकळी हाजी : भाजप, कंत्राटे घेणाऱ्या पक्षांना हाताशी धरून राज्यांत सामाजिक अशांतता पसरविण्यांचे षडःयत्र करीत असल्यांची टिका राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच राज ठाकरे यांच्या भोंगयाबाबतच्या भूमिकेवरही पाटलांनी निशाणा साधला आहे. टाकळी हाजी ता शिरूर येथे घोडनदीवरील पुल, वडनेर टाकळी हाजी मलठण रस्ता, टाकळी हाजी अंतर्गत चौपदरीकरण अश्या १३ कोटी रुपयांच्या कामांचे भुमिपुजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

 दिलीप वळसे पाटील म्हणाले, मशिदीवरील भोंगे काढून अजान बंद करा. अन्यथा आम्ही हनुमान चालिसा वाचु असे म्हणणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना हे माहीत नाही का? यामुळे ग्रामिण भागात रात्री चालणारे किर्तन पहाटेच्या काकड आरत्या शिर्डी पंढरपुरच्या आरत्या देखील बंद होणार आहेत. यांचा परिणाम मुस्लिम धर्माबरोबरचं हिंदु धर्माच्या कार्यक्रमावर देखील होणार आहे. केवळ जाती धर्मात वाद लावायचे, हिंदुचे रक्षणकर्ते आहोत असे दाखवायचे व मतांचे ध्रुर्वीकरण करायचे हाच कार्यक्रम सध्या सुरु असल्या बददल गृहमंत्री वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त करीत भाजप मनसेवर जोरदार प्रहार केला. या काळात मुस्लिम धर्मियांनी राज्यात अंत्यत सामंजस्याची भुमिका घेतल्या बदद्ल गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले. आपला देश कुणी उभा केला, विकास कुणी केला यांचा इतिहास तरुणांना सांगणे गरजेचे आहे. मात्र सध्या त्यांच्या पर्यंत चुकीची माहीती सोशल मिडियाच्या माध्यमामधून पोहोचवत काही शक्ती विष पेरण्यांचे काम करीत आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल ते म्हणाले, नेत्यावर झालेल्या टिकेला कार्यकर्त्यांनी उत्तर द्या. खालच्या पातळी वरील टिका सहन केली जाणार नाही.

मतभेद विसरा ... 
   
जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरचं होणार आहेत. हा भाग शरद पवार यांच्या विचाराचा बालेकिल्ला असून येथे मोठ्या प्रमाणात विकास पक्षाच्या माध्यमामधून केला आहे. मात्र अंतर्गत मतभेद विसरा, गट तट विसरून जनतेच्या विकासासाठी एकत्र या असे आव्हान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

Web Title: Due to the role of speakers Kakad Aarti will also be closed Doesnt Raj Thackeray know this Question from Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.