पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजरच्या खुनाचे कारण उघडकीस, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 02:20 PM2022-11-01T14:20:16+5:302022-11-01T14:25:43+5:30

हॉटेल बंद करून घरी निघाला असता भर रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने...

Due to 'this' reason, Garwa hotel manager was murdered, the reason will be shocking | पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजरच्या खुनाचे कारण उघडकीस, कारण ऐकून बसेल धक्का

पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजरच्या खुनाचे कारण उघडकीस, कारण ऐकून बसेल धक्का

googlenewsNext

पुणे : पुण्यातील धायरी परिसरात तीन दिवसांपूर्वी गारवा हॉटेलचा मॅनेजर भरत भगवान कदम (वय 24) याचा निर्घृण खून झाला होता. हॉटेल बंद करून घरी निघाला असता भर रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

याप्रकरणी अनिकेत मोरे, धिरज सोनवणे यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. याबाबत भरत यांचा भाऊ प्रकाश कदम यांनी तक्रार आहे. आरोपींनी रेकी करून, भरत कदम याची संपूर्ण माहिती काढून हा खून केला. 

खुनाचे कारण काय?

त्यातील प्रमुख आरोपी अनिकेत मोरे याने हा संपूर्ण कट रचला होता. अनिकेत आणि त्याच्या मैत्रिणीचे भांडण झाल्यानंतर ती भरत याच्याशी बोलत होती. त्याचा राग अनिकेत मोरे यांच्या मनात होता. याच कारणावरून त्यांच्या भांडण देखील झाले होते. त्यानंतरही भरत कदम त्या मुलीच्या संपर्कात होता. याचा राग आल्याने अनिकेत मोरे यांनी भरतचा खून करण्याचा कट रचला. 

असा केला खून-

अनिकेतने भरत कधी आणि कोणत्या रस्त्याने घरी जातो, याची रेकी केली. ही माहिती घेऊन त्याने या चौघांना पुरविली. त्यानंतर आरोपींनी भरत याचा दोन दिवसांपूर्वी रात्री साडे बाराच्या सुमारास घरी जात असताना खून केला. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून भरत घरी जात असताना त्याला नर्‍हे येथील श्री कंट्रोल चौक रस्ता ते धायरेश्वर रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले होते. तसेच, त्याचा खून करण्यात आला होता.

Web Title: Due to 'this' reason, Garwa hotel manager was murdered, the reason will be shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.