मुसळधार पावसामुळे वरवडी पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:00+5:302021-07-24T04:09:00+5:30

तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी डायमुख, वरवडी खुर्द, कळकवाडी, शेरताटी, धनावडेवाडी, वरवडी या गावाचा संपर्क तुटला आहे. गेले तीन दिवस ...

Due to torrential rains, the villages in Varavadi Panchkrushi were cut off | मुसळधार पावसामुळे वरवडी पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे वरवडी पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला

googlenewsNext

तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी डायमुख, वरवडी खुर्द, कळकवाडी, शेरताटी, धनावडेवाडी, वरवडी या गावाचा संपर्क तुटला आहे. गेले तीन दिवस मुसळधार पावसाने डोंगरातून येणारे पाणी ओढ्यात न मावल्याने ओढ्या लगतचा परिसर जलमय झाल्याने वरवडी पंचक्रोशीचा संपर्क तूटला आहे. वरवडी खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळील ओढा, वरवडी बुर्दुक, वरवडी डायमुख येथील ओढ्याला पूर आल्याने कामानिमित्त गेलेले कामगार, शेतकरी, मजुर गावा पर्यंत पोहचू शकत नाहीत.

सदर भागातील गावे डोंगराच्या कुशीत वसलेली असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गावकऱ्यांनी सुरक्षीत ठिकाणी जावे असे आवाहन वरवडी खुर्द सरपंच राजेंद्र वरे यांनी केले आहे.

--

२३ भोर तालुका पाऊस

वरवडी खुर्द (ता. भोर) येथील ओढ्याला आलेला पूर.

Web Title: Due to torrential rains, the villages in Varavadi Panchkrushi were cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.