गावाच्या एकीमुळे श्री क्षेत्र भालगुडी ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:40+5:302021-01-10T04:09:40+5:30
पंचायत समिती ,जिल्हा परिषद किंवा आमदारकीच्या प्रचाराचा नारळ येथील देवस्थानाच्या ठिकाणी वाढवूनच उमेदवार आपल्या प्रचाराची सुरुवात करत असतात त्यामुळे ...
पंचायत समिती ,जिल्हा परिषद किंवा आमदारकीच्या प्रचाराचा नारळ येथील देवस्थानाच्या ठिकाणी वाढवूनच उमेदवार आपल्या प्रचाराची सुरुवात करत असतात त्यामुळे श्री क्षेत्र हे एका अर्थाने तालुक्यासाठी आध्यात्मिक श्रद्धास्थानाबरोबरच राजकीय मंडळींचेही प्रेरणा स्थान मानण्यात येते. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष होते. भालगुडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तालुक्यातील नागरिक व राजकीय नेते मंडळीनी येथील ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले.
निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे श्री.क्षेत्र नारायण देव मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना गावच्या विकासाचा झेंडा आम्ही सगळे एक जुटिने हाती घेऊ असे रामदास साठे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी माऊली भाऊ साठे , अशोक साठे मा.उपसरपंच, ज्ञानेश्वर नथु साठे सा.कार्यकर्ते, अंकुश साठे तंटा मुक्ती अधक्ष ,साधु साठे.सदाशिव साठे,गणपत कदम ,वृशालीताई साठे,माजी सरपंच, संजय साठे.विभाग प्रमुख, पै.मंगेश साठे. युवा सेना, निवृत्ती केंडे शिवसेना नेते, रोहिदास बोडके, तसेच सर्व ग्रामस्थ या सर्वांचे योगदान मौलाचे होते.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढील प्रमाणे-
रामदास झुकाजी साठे, संतोष बबन साठे, संतोष शंकर साठे, लक्ष्मी लहुभाऊ साठे, वनिता देविदासभाऊ साठे, स्नेहल मंगेश साठे, मंगल दत्तु मोरे.
०९ पौंड
श्री क्षेत्र भालगुडी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य ग्रामस्थांसमवेत आनंद व्यक्त करताना