नियोजनशून्य कामामुळे पुणे-पौड रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:05+5:302021-07-18T04:09:05+5:30
मुळशीचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या भूगाव येथे दररोज होणारी वाहतूककोंडी सुटण्याचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या अनेक ...
मुळशीचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या भूगाव येथे दररोज होणारी वाहतूककोंडी सुटण्याचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद रस्त्यामुळे व गेल्या दोन वर्षांपासून आतापर्यंत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामामुळे दररोज सकाळी व संध्याकाळी होत असलेली वाहतूककोंडी यामुळे या रस्त्यावरून नेहमी ये-जा करणारे वाहनचालक पुरते वैतागले आहेत.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच महामार्गावरून पौड येथून जात असताना पत्रकार दत्तात्रय उभे यांचा अपघात होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी भूगाव येथे रात्री साडेदहाच्या सुमारास चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मंगेश जिजाबा चोरघे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट असलेल्या इंडिया रोडवेज कंपनीविरोधात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने केली. प्रशासनाच्याही निदर्शनास ही बाब निदर्शनास आणून दिली असली तरी प्रशासनाकडूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांतून अत्यंत नाराजी व्यक्त केली जात आहे.
१७ पौड
भूगाव येथे रामनदी पुलावरील अर्धवट अवस्थेत असलेले रस्त्याचे काम.