वाघळ तलाव भरल्याने पाणीप्रश्न सुटला
By admin | Published: April 22, 2016 01:06 AM2016-04-22T01:06:13+5:302016-04-22T01:06:13+5:30
निरवांगीनजीकचा वाघाळ तलाव, दगडवाडी तलाव पाटबंधारे खात्याने भरल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, सराफवाडी गावांचा व परिसरातील वाड्यावस्त्यांना सध्या
निरवांगी : निरवांगीनजीकचा वाघाळ तलाव, दगडवाडी तलाव पाटबंधारे खात्याने भरल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, सराफवाडी गावांचा व परिसरातील वाड्यावस्त्यांना सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. किमान एक महिन्याचा पाणीप्रश्न सुाटला आहे.
निमसाखर, निरवांगी, सराफवाडी, दगडवाडी, रासकरमळा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे परिसरात आता निमसाखर येथे एक दिवसाआड तर दगडवाडी, रासकरमळा, सरफवाडी, निरवांगी या गावांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे शिरसटवाडी, हगारवाडी, जाधववस्ती, गोतोंडी परिसरात या आवर्तनामुळे पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
हे तलाव भरण्यासाठी निमगाव पाटबधारे येथील अधिकारी लक्ष्मण सुद्रीक, निरवांगी येथील सरपंच नानासाहेब पोळ, निमसाखर
येथील सरपंच अरुणा चव्हाण, दगडवाडीचे सरपंच पिंगळे, येथील ग्रामसेवक व पाटबंधारे खात्याचे सहकार्य मिळाले.