उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:04 PM2017-11-02T12:04:34+5:302017-11-02T12:27:35+5:30

सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल.

Due to the work of the flyovers, stop the road from the COEP Chowk to Pune RTO | उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद

उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद

Next
ठळक मुद्देमहापालिकेकडून येथील उड्डाणपुलाचे काम सुरू संध्याकाळच्या वेळी सिमला आॅफिस चौक, विद्यापीठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी

पुणे : सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल. या बदलामुळे गुरूवारी सकाळच्या वेळी आॅफिसला जाणार्‍यांची गर्दी आरटीओलगतच्या चौकात पहायला मिळाली.
महापालिकेकडून येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. संचेती हॉस्पिटलकडून तसेच जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने सीओईपी चौकातून आरटीओकडे वाहनांना बंदी असेल. मात्र सीओईपी चौकातून जंगली महाराज रस्त्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत चालणार आहे. 
पाटील इस्टेटकडून आरटीओकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी उड्डाणपुलावरून संचेती हॉस्पिटलसमोरून न्यायालय येथून शाहीर अमर चौक मार्गाचा वापर करावा. तर सिमला आॅफिसकडून आरटीओकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून न्यायालयासमोरून जाऊ शकतात.
दरम्यान हा बदल उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी सिमला आॅफिस चौक, विद्यापीठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. या बदलामुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Due to the work of the flyovers, stop the road from the COEP Chowk to Pune RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.