Pune : लष्कराच्या लेखी परीक्षेत डमी बसविणाऱ्यांना अटक; विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:50 PM2023-03-30T12:50:54+5:302023-03-30T12:51:31+5:30
हा प्रकार धानोरी येथील भैरवनगरमधील ग्रीफ बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडला...
पुणे : लष्कराच्या एमएस डब्ल्यू ग्रुप सी कुक या पदाकरिता लेखी परीक्षेत आपल्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराला बसवून फसवणूक करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी राहुल मेंहेंद्रसिंह राठी (वय ४२) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दीपू कुमार (वय २३, रा.बिहार) आणि शैलेंद्रसिंग (वय २४, रा.उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.
हा प्रकार धानोरी येथील भैरवनगरमधील ग्रीफ बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे बीआरओ स्कूल ॲन्ड सेंटर येथे एक्झिक्युटिव्ही इंजिनीअर आहेत. भैरवनगर येथील ग्रीफ बॉर्ड रोड ऑर्गनायजेशन येथे मल्टी स्किल्स वर्कर (एमएसडब्ल्यू), कुक (ग्रुप्र - सी) या पदाकरिता लेखी परीक्षा होती. त्यासाठी शैलेंद्रसिंग याच्या जागेवर दीपू कुमार हा बसून परीक्षा देत असल्याचे लक्षात आले. हे लक्षात आल्यावर परीक्षकांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.