‘दिगंबरा दिगंबरा’च्या नामाने दुमदुमला परिसर
By admin | Published: December 6, 2014 10:49 PM2014-12-06T22:49:58+5:302014-12-06T22:49:58+5:30
श्रीक्षेत्न नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता भव्यदिव्य शाही मिरवणुकीने शनिवारी झाली.
Next
नारायणपूर : श्रीक्षेत्न नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता भव्यदिव्य शाही मिरवणुकीने शनिवारी झाली. सकाळी दत्तमंदिरात आरती होऊन दत्तात्नयांच्या पादुकांसह ब्रrा-विष्णू-महेश्वरांच्या मूर्ती पालखीमध्ये विराजमान करण्यात आल्या.
पालखीत देव विराजमान होताच फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात दत्त मंदिरापासून या भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंटांचा समावेश मोठय़ा प्रमाणात होता. मिरवणुकीच्या अग्रभागी परमपूज्य सद्गुरू नारायणमहाराज चालत होते आणि मान्यवर या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
दत्तमंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला आणि चंद्रभागा कुंडाकडे दत्तभक्तांचे पाय वळू लागले. मुखी दत्तात्नयांचे नाम, हातामध्ये ब्रrासंप्रदायाचे प्रतीक असणारी भगवी पताका यांमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
‘या या नारायणपूरचा महिमा कितीसा असा सांगावा, येथे दत्तात्नय राहती इच्छा मनीची पुरी करती.’ या भजनी मंडळाच्या टाळमृदंगाच्या ठोक्यावरील भजनाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. पालखी पाराजवळ येताच या ठिकाणी जमलेल्या दत्तभक्तांनी पुष्पवृष्टी केली. पालखीला खांदा दिलेल्या सेवेकरिणी ‘घेऊन निघालो दत्ताची पालखी’ या भक्ती गीताच्या तालावर पालखी चंद्रभागा कुंडावर 11 : 3क् मि. विसावली. पालखी चंद्रभागा कुंडावर विसावत असताना सनई, तुतारी, शंखनाद करताच शिष्यवर्गाची लगबग सुरू झाली. सद्गुरू नारायणमहाराज यांनी पालखी ठेवणाचा आदेश देऊन त्यामधील ब्रrा-विष्णू-महेशांच्या पवित्न मूर्र्ती पाटावर पूजेसाठी ठेवण्यात आल्या.
कावडीतील पाण्याचे विधीवत विसर्जन
नारायणमहाराजांनी कुंडास नमस्कार करून गिरनार पर्वतावरून आणलेल्या कावडीतील पाण्याचे कुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. नंतर दही, दूध, फळे, फुले यांचा महाप्रसाद कुंडास अर्पण करण्यात आला. तसेच, चंद्रभागा कुंडाची ओटी भरण्यात आली. दत्तपादुकांचे पूजन व जलाभिषेक करण्यात आला. सुमारे 5 तास चाललेल्या या सोहळ्यास देशभरातील दत्तभक्तांनी हजेरी लावली होती. विधिवत पूजा होताच दत्तात्नई ग्राम प्रदक्षिणोसाठी रवाना झाली. ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीला ओवाळले. ठीक 1.3क् वा.पालखी परत मंदिरात विसावली. त्यानंतर देवभेट होऊन मधान्ह आरती झाली. आरती होताच 2.3क् नंतर माधुकरीचा कार्यक्रम होऊन नारायणमहाराज दर्शन सोहळा पार पडला.
शांतता वा सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड व भोर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, एसटी महामंडळाच्या वतीने सासवड व भोर आगाराने ज्यादा गाडय़ांची सोय करण्यात आली होती.
आरोग्य विभागानेही भाविकांसाठी ठिकठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केली होती. सासवड नगर परिषदेने अग्निशामक गाडीचीही व्यवस्था केली होती. तसेच, पूर-पोखर ग्रामपंचायतीनेही चांगली व्यवस्था ठेवली होती.