भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:01 AM2017-12-01T03:01:44+5:302017-12-01T03:02:12+5:30

लग्न ठरलेल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आप्तस्वकीयांना देण्यासाठी दुचाकीवरून पुणे येथे निघालेल्या पती-पत्नीस मागून भरधाव आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले.

 Dummy bunker; Spouse killed | भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार

Next

लोणी काळभोर : लग्न ठरलेल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आप्तस्वकीयांना देण्यासाठी दुचाकीवरून पुणे येथे निघालेल्या पती-पत्नीस मागून भरधाव आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले. ही दुर्दैवी घटना पुणे-सासवड राज्य मार्गावर आज दुपारी १च्या सुमारास घडली.
या अपघातात संपत रघुनाथ अवचरे (वय ६१) व वंदना संपत अवचरे (वय ५२, रा. अव्हेन्यू सोसायटी, वडकी, ता. हवेली) हे पती-पत्नी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी वंदना यांचे बंधू उमेश धर्माजी गायकवाड (वय ४४, रा. सिद्धार्थनगर, वडकी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
मुलगी प्रियंका हिच्या विवाहाच्या पत्रिका आप्तस्वकीय व मित्रमंडळींना देण्यासाठी अवचरे दाम्पत्य दुचाकीवरून (एमएच १४-एफपील २१६९) पुणे येथे निघाले होते. ११.३०च्या सुमारास ते उमेश गायकवाड यांच्या घरी गेले. तेथे चहापान करून १२.१५च्या सुमारास पुण्याकडे निघाले. दुपारी १ च्या सुमारास ते उरुळी देवाची गावाच्या हद्दीत असलेल्या सासवड-पुणे राज्यमार्गावर असलेल्या गायत्री साडी सेंटरसमोरील पुलावर आले. या वेळी मागून आलेल्या भरधाव डंपरने (एमएच १२-एचडी ८८१५) त्यांना धडक दिली. दुचाकीवरून दोघेही रस्त्यावर पडल्याने व डंपरचे पुढील चाक त्यांचे अंगावरून गेल्याने दोघेही चिरडले गेले. यातच त्यांचा अंत झाला.

पुणे-सासवड राज्यमार्गावर सातववाडी ते सासवडदरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बहुतांश ठिकाणच्या साईडपट्ट्या खचल्याने एक ते दीड फुटाचे
खड्डे तयार झाले आहेत. यामुळे या मार्गावर सतत अपघात होतात. काही वर्षांपासून रस्तारुंदीकरणाच्या फक्त घोषणा होत आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात मात्र होत नाही. आजच्या अपघातात मुलीचे लग्न पाहण्याअगोदरच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर रस्तादुरुस्ती करणार? असा सवाल प्रवासी व रस्त्यालगत राहणाºया नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Dummy bunker; Spouse killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.