नृृत्यांगनेची कलेला शिक्षणाची जोड
By admin | Published: January 3, 2017 06:32 AM2017-01-03T06:32:28+5:302017-01-03T06:32:28+5:30
वयाच्या सातव्या वर्षापासून यमुनाबाई वाईकर, मधू कांबीकर यांसह नामांकित कलाकारांकडून नृत्यकलेचे धडे घेतले. देशभरात लावणी नृत्याचे सादरीकरण करून
पुणे : वयाच्या सातव्या वर्षापासून यमुनाबाई वाईकर, मधू कांबीकर यांसह नामांकित कलाकारांकडून नृत्यकलेचे धडे घेतले. देशभरात लावणी नृत्याचे सादरीकरण करून अनेक पारितोषिके व पुरस्कार पटकावले. मात्र, केवळ नृत्यकलेत निष्णात न राहता उच्च शिक्षण घेऊन त्याला ज्ञानाची जोड द्यावी, या हेतूने तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात
प्रवेश घेतला. आता ‘गझलनृत्य’ सादर करून ती गझलप्रेमी रसिकांसाठी एक वेगळीच पर्वणी घेऊन येणार आहे.
रेश्मा मुसळे असे या नृत्यांगनेचे नाव आहे. नृत्यकलेचा वारसा त्यांना आपल्या आजी व आईकडूनच मिळाला. बालपणापासून तिने लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गोविंदराव निकम यांच्याकडून कथक नृत्याचेही धडे घेतले. केवळ कलेचे शिक्षण घेऊन उपयोग नाही. त्याला शिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी बहि:स्थ पद्धतीने मराठी विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. जगभरात नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निश्चिय केला. त्यासाठी दोन वर्ष प्रवेशासाठी प्रतीक्षा केली. यंदा त्यांना एम. ए. अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला आहे.
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तिला लोककलेत पीएच. डी. करायची आहे. केवळ प्रात्यक्षिकावर अवलंबून न राहता त्याला अभ्यासाची जोड देण्यासाठी रीतसर शिक्षण घ्यायचे आहे. आपण घेतलेल्या कलेचे प्रशिक्षण इतरांनाही मिळावे, या उद्देशाने लावणीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था सुरू करण्याचे प्रयत्न तिने सुरू केले आहेत.
मराठी विभागातील विविध उपक्रमात ती उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. विभागातर्फे येत्या १२ व १३ जानेवारी रोजी गझल विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ती ‘गझलनृत्य’ सादर करणार
आहेत. गझलनृत्य हा नवीन नृत्य
प्रकार आहे. त्यामुळे विविध
चित्रपटात ठुमरीवर सादर केलेले नृत्याविष्कार सादर करणार असल्याचे रेश्मा मुसळे यांनी सांगितले. सांगितले.