वानवडीत महिलांचा दुर्गावतार

By admin | Published: May 5, 2017 03:09 AM2017-05-05T03:09:28+5:302017-05-05T03:09:28+5:30

रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून छेड काढणाऱ्या राकेश ऊर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चांगलाच चोप दिला. या महिलांनी

Durgavtar of Wanwadi women | वानवडीत महिलांचा दुर्गावतार

वानवडीत महिलांचा दुर्गावतार

Next

हडपसर : रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून छेड काढणाऱ्या राकेश ऊर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चांगलाच चोप दिला. या महिलांनी केलेल्या मारहाणीत डिंग्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत आहे. डिंग्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत रामटेकडी येथील एका ५५ वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ या महिलेच्या शेजारी राहणारा डिंग्या हा कायमच महिलांची छेडछाड काढत होता. ही महिला व तिच्या ५ सुना व इतर महिला बुधवारी रात्री ९ वाजता पाणी भरण्यासाठी नळकोंडाळ्यावर पाणी येण्याची वाट पाहात होत्या़ त्यावेळी डिंग्या त्यांच्यासमोर आला  व त्याने लज्जा उत्पन्न होईल,  असे अश्लील चाळे करण्यास  सुरुवात केली़
त्यावर या महिलांनी त्याला खडसावताच त्यांना तो शिव्या देऊ लागला. त्यावेळी सर्व महिलांनी त्याला धरा, असा आरडाओरडा करताच तो त्या महिलेवर धावून आला. या महिलेच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहून चिडलेल्या इतर महिलांनी त्याला पकडले़ एका महिलेने चुलीसाठी घराबाहेर  ठेवलेले लाकूड आणून त्याने त्याला चोप दिला़ त्यामध्ये तो जखमी  झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले़  डिंग्या हा कॅन्टोन्मेंट बोर्डात सफाई कामगार म्हणून काम करतो. या आधीही त्याच्या विरोधात महिलांनी तक्रारी केल्या होत्या़ पण, त्यावर काहीही कारवाई झाली नव्हती़

या भागात पाणी रात्री उशीरा येत असल्याने महिला सार्वजनिक नळकोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी उशिरापर्यंत थांबलेल्या असतात़ त्याचा गैरफायदा घेऊन तो अश्लील चाळे करीत असे. त्यामुळे रामटेकडी परिसरातील महिला या त्रासाला कंटाळल्या होत्या. त्याच्या अशा कृत्याला वैतागूनच परिसरातील महिलांनी त्याला बेदम चोप दिला. त्यात तो जखमी झाला असून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे़

Web Title: Durgavtar of Wanwadi women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.