नाकाबंदीदरम्यान सराईत अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:32 AM2017-09-02T01:32:54+5:302017-09-02T01:33:11+5:30

रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला. शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या ११ घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली

During the blockade, | नाकाबंदीदरम्यान सराईत अटकेत

नाकाबंदीदरम्यान सराईत अटकेत

Next

पुणे : रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला. शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या ११ घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७0८ ग्रॅम वजनाचे १७ लाख ७२ हजार रूपये किमतीचे सोन्याचे, ९00 ग्रॅम चांदीचे ३६ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १८ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रणव विकास चांदगुडे (वय-१९, रा. तुषार हाईट्स, दांगट पाटीलनगर शिवणे, पुणे) अशा सराईत गुन्हेगारासह चोºयांमध्ये मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने विक्रीस मदत करणाºया श्रीकांत नंदकुमार झगडे ( वय २१ रा. ८४/१६५ आर्मन सोसायटी कोथरूड) आणि कमलेश संतोष मोकर (वय २९ रा.मु.पो मातळवाडी फाटा, भूगाव ता.मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणे, जेलमधून नुकत्याच सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे, बाधित क्षेत्रात नाकाबंदी करणे अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी कर्वेनगर परिसरात केलेल्या नाकाबंदीदरम्यान आरोपीला २६ आॅगस्ट रोजी संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याजवळील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी रॉड, लेडीज पर्स, चांदीचे तीन पैंजण व रोख सात हजार रुपये माल सापडला.
त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने ११ घरफोड्या केल्याचे कबूल केले. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) प्रकाश खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सीताराम धावडे, सहायक पोलीस फौजदार जगन्नाथ गोरे, अमर भोसले, बालारफी शेख, संतोष देशपांडे, चंद्रकांत जाधव, सुधीर पाटील, पोलीस शिपाई सुभाष गुरव, विजय कांबळे, संजय दहिभाते व संदीप शेळके यांनी प्रयत्न केले.

Web Title: During the blockade,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.