कोरोनाकाळात ६०,००० रुग्णांना मिळाला १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:01+5:302021-03-26T04:11:01+5:30

पुणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका संजीवनी ठरली आहे. कोरोनाकाळात म्हणजे मार्च-२०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ६०७४३ कोरोना ...

During the Corona period, 60,000 patients received the benefit of 108 ambulances | कोरोनाकाळात ६०,००० रुग्णांना मिळाला १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

कोरोनाकाळात ६०,००० रुग्णांना मिळाला १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

Next

पुणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका संजीवनी ठरली आहे. कोरोनाकाळात म्हणजे मार्च-२०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ६०७४३ कोरोना संशयित व बाधित रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वेळेत रुग्णालयात दाखल होता आले. पुणे विभागात सात वर्षांत एकूण ११ लाखांहून अधिक रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा दिली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोनाकाळात तब्बल २२६ सरकारी रुग्णवाहिका कार्यरत होत्या. यात १०८ च्या ८२ रुग्णवाहिका असून यातील ३१ रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर जिल्हा परिषदेच्या १०२ सुविधेच्या ९२ रुग्णवाहिका आणि खासगी ५२ रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात गंभीर होणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णाला सरकारी रुग्णवाहिकेमार्फतच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील कोरोना हाॅस्पिटलमध्ये घेऊन येतात. यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी या सरकारी रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध आहेत.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १०८ रुग्णवाहिका सेवेने २०१४ पासून कार्यतत्परतेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १०८ रुग्णवाहिकेची सेवा प्रारंभ झाल्यापासून राज्यात तब्बल ४ लाखांहून अधिक अपघातग्रस्त रुग्णांना सेवा मिळाली आहे. पुणे विभागात अपघातातील जखमी रुग्णांच्या संखेत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ५३% टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९ मध्ये १०१४३ अपघातग्रस्त रुग्णांना सेवा दिली व २०२० मध्ये ५४४९ अपघातग्रस्त रुग्णांना सेवा देऊन १०८ रुग्णवाहिकेने जीव वाचवले.

पुणे विभागात जानेवारी २०१४ पासून फेबुवारी २०२१ पर्यंत रुग्णवाहिका ७१७४ बालकांचे जन्मस्थान ठरली. यामध्ये पुणे ३२०६, सोलापूर २०६७ व सातारा १९०१ असा जिल्हानिहाय बालकाचा जन्म १०८ रुग्णवाहिकेमध्ये झाला.

-----

जिल्हानिहाय कोविड -१९ रुग्णांना दिलेली सेवा :

पुणे जिल्हा - २०५०४

सोलापूर जिल्हा - २२१५५

सातारा जिल्हा - १८०८४

-----

१०८ रुग्णवाहिकेने २०२० मध्ये दिलेल्या वैद्यकीय सेवा

(पुणे जिल्हा)

अपघात -२४८६

हल्ला - ४४६

जळणे - १०३

हृदयरुग्ण - ५०

विषबाधा - ८१६

प्रसूती - ११३२४

आत्महत्येचा प्रयत्न - ३९

Web Title: During the Corona period, 60,000 patients received the benefit of 108 ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.