दिवसभरात २१४ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:37+5:302021-01-13T04:22:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २६४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २१४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २६४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६८९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३०५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६६७९ झाली आहे. पुण्याबाहेरील २ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण २१४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार १४३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ६७९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९५४ नागरिकांची स्वॅब तपासणी केली असून, आतापर्यंत ९ लाख ५९ हजार ६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.