दिवसभरात २२९ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:45+5:302021-01-25T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २०८ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २२९ रुग्णांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २०८ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांतील २०६ रुग्ण अत्यवस्थ असून, दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २९३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७३८ झाली आहे.
दिवसभरात एकूण २२२९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७७ हजार ८९३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८४ हजार ६८२ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५१ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ८३६ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख ३ हजार ८४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.