दिवसभरात २४६ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:51+5:302020-11-22T09:39:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४४३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २४६ ...

During the day, 246 patients were cured | दिवसभरात २४६ रुग्ण झाले बरे

दिवसभरात २४६ रुग्ण झाले बरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४४३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३९५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८२१ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार ६१ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ४ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४२१ झाली आहे.

दिवसभरात एकूण २४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार ४१० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६६ हजार ६५२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ८२१ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ३९६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख ८५ हजार ७७६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: During the day, 246 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.