पावसाळ्यात वरंध घाट रस्ता अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:31 PM2022-07-07T21:31:04+5:302022-07-07T21:31:44+5:30

पुणे : प्रमुख राज्यमार्ग क्र. १५ महाड ते पंढरपुर (नवीन घोषीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) या महामार्गावरील धोकादायक असलेला ...

During monsoon, Warandh Ghat road is completely closed for heavy traffic | पावसाळ्यात वरंध घाट रस्ता अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद

पावसाळ्यात वरंध घाट रस्ता अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद

googlenewsNext

पुणे: प्रमुख राज्यमार्ग क्र. १५ महाड ते पंढरपुर (नवीन घोषीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) या महामार्गावरील धोकादायक असलेला भाग कि.मी. ८१/६०० ते कि.मी. ८७/०० वरंध घाट रस्ता  पावसाळा कालावधीत  ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणारचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

 जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या  पिवळा, नारंगी आणि लाल  इशाऱ्याच्या वेळी दुचाकी तीन चाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहानांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद करुन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: During monsoon, Warandh Ghat road is completely closed for heavy traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.