Pune: नवरात्र उत्सवामध्ये राहू परिसरात एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:01 IST2023-10-26T14:01:09+5:302023-10-26T14:01:58+5:30
सुमारे दोन लाख अठरा हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे....

Pune: नवरात्र उत्सवामध्ये राहू परिसरात एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी
पाटेठाण (पुणे) : राहू (ता. दौंड) परिसरात सातत्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवव्या माळेच्या दिवशी चोरट्यांनी एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी करून सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे दोन लाख अठरा हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
राहूतील संत सावता माळी सभागृहानजीक ही घटना सोमवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सुरेश दत्तात्रय हंबीर (रा. राहू, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश हंबीर यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच शेजारी राहणारे अविनाश सुरेश गाढवे यांच्या घरात प्रवेश करून घरफोडी करत दोन मोबाईल, बाळासाहेब महादू कुंभार यांचा एक मोबाईल फोन असा एकूण दोन लाख अठरा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. तपास यवत पोलिस करीत आहेत.